अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत पार्ले बॉईज संघ विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवासेना विलेपार्ले विधानसभा शाखा क्र. 83 आयोजित युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत पार्ला बॉईज संघाने जेतेपद पटकावले. चॅलेंजर बॉईज उपविजेता ठरला. पार्ल्याच्या वामन दुभाषी मैदानावर झालेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उपविभागप्रमुख समीर साबे, चंद्रकांत पवार, शाखाप्रमुख नरेश सावंत, विभाग अधिकारी सिद्धेश पवार, चिटणीस विश्वास पाटेकर तसेच तानाजी मनवे, समीर गोरुले, गणेश देसाई, सचिन पवार, राजन परब, अविनाश माईन, किरण शेवडे, पारस पुजारी, जोखीम डिसिल्वा, विवेक शेवडे, नितीन ठोंबरे, दीपक दळवी, प्राणिल चिले, संकेत नर यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेला अनिल कालकर यांचे सहकार्य लाभले आणि युवासेना शाखा अधिकारी रोहित घाग यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.