
माटुंगा येथील यशवंतराव नाटय़गृहात लवकरच तिसरी घंटा वाजणार आहे. 5 ऑगस्ट रोजी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लीनर’ आणि रविवार 6 ऑगस्ट रोजी प्रशांत दामले फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकांच्या प्रयोगांनी यशवंत रंगमंदिराचा पडदा उघडणार आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून मिळणाऱया उत्पन्नाचा मोङ्गा हिस्सा इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाङ्गी देण्याचा निर्णय या दोन्ही नाटकांच्या निर्मात्यांनी घेतला आहे. नूतनीकरण करण्यात आल्यानंतर हे नाटय़गृह 1 ऑगस्टपासून नव्या रंगरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, कार्यकारी समिती, नियामक तसेच विश्वस्त मंडळ यांनी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावे यासाङ्गी प्रयत्न केले होते.





























































