Video – मुलांनी भोकाड पसरलं म्हणून नकली दहशतवाद्याच्या कानशिलात लगावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या माथेफिरू किंवा दहशतवाद्याचा हल्ला होणे, आग लागणे किंवा भूकंपासारख्या आप्तकालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रसंगावधान गरजेचं असतं. तेच प्रसंगावधान वाढीस लागावं म्हणून पोलीस, अग्निशमन दल बऱ्याचदा मॉक ड्रिलचं आयोजन करत असतात. धुळ्यात मात्र हे मॉक ड्रिल पोलिसांच्या अंगाशी आलं आहे.

दहशतवाद्यांच्या हल्ला झाल्यास त्वरित हालचाली काय कराव्यात, याविषयी धुळ्यातील एका मंदिर परिसरात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही पोलीस रायफल घेऊन बनावट दहशतवादी बनले होते. या सगळ्या नाट्याला सुरुवात झाली, तेव्हा दहशतवाद्यांच्या भूमिकेतील पोलिसांनी नागरिकांच्या भूमिकेत असलेल्यांवर बंदूक रोखली. हे सगळं नाट्य पाहून तिथे दर्शनासाठी आलेल्यांपैकी काहींची मुलं घाबरली आणि त्यांनी रडायला सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मुलांना रडत असलेलं पाहून त्यांपैकी एका पालकाला संताप अनावर झाला. त्याने ताबडतोब मॉक ड्रिलच्या दिशेने धाव घेतली आणि दहशतवादी झालेल्या पोलिसाच्या कानशिलात लगावली. मुलं रडताहेत, तुम्हाला अक्कल आहे का, असा प्रश्नही त्या पालकाने उपस्थित केला. सुदैवाने परिस्थिती अजून बिघडायच्या आधीच उर्वरितांनी संबंधित पालकाला समजावलं आणि शांत केलं. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.