
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांसाठीची सोडत येत्या 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. या 4082 घरांसाठ तब्बल 1 लाख 20 हजार 144 अर्ज आले आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ही घोषणा केली आहे.
मुंबई मंडळातर्फे सोडतीत जाहीर 4082 सदनिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1947 सदनिकांचा समावेश आहे. प्रधान मंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता 22472 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातिल 843 सदनिकांसाठी 28862 अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी (415) या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिकांसाठी 60,522 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगांव(416) या योजनेकरिता आहेत आहेत तर मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांसाठी 8395 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत आणि उच्च उत्पन्न गटातील 120 सदनिकांसाठी 2068 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोली कांदीवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता आहेत.


























































