
हिंदुस्थानी लष्करासाठी लढाऊ अपाचे हेलिकॉप्टरची निर्मिती अमेरिकेच्या बोइंग कंपनीने सुरू केली आहे. 4 हजार 168 कोटींच्या या करारानुसार एकूण सहा अपाचे शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर 2024 मध्ये हिंदुस्थानी लष्कराला मिळणार आहेत.
एएच-64 अपाचे वर्गातील हे हेलिकॉप्टर जगातील सर्वात अत्याधुनिक बहुउद्देशीय लढाऊ हेलिकॉप्टर म्हणून प्रसिद्ध असून अमेरिकेच्या लष्करात या हेलिकॉप्टरचाच वापर होतो. 2020 मध्ये हिंदुस्थानच्या हवाई दलाकडे बोइंगने 22 ई-मॉडेल अपाचे हेलिकॉप्टर दिली आहेत.




























































