मॅजिक बॉक्स- बत्तीस शिराळ्याची नागपंचमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक डुंबरे

सांगली जिह्यातील बत्तीस शिराळा येथील नागपंचमी प्रसिद्ध आहे. रामदास स्वामींनी जी 11 हनुमानाची मंदिरे स्थापन केली, त्यातील एक मंदिर या गावात आहे. 1973 मध्ये मी दूरदर्शनमध्ये असताना बत्तीस शिराळा येथील नागपंचमीच्या सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी गेलो होतो. हे चित्रीकरण न विसरण्याजोगे आहे. नाग पकडण्यापासून ते सर्व प्रािढया चित्रित केल्या होत्या. सुमारे 28  मिनिटांचा लघुपट तयार केला होता. प्रथमच असा नागपंचमी सोहळा महाराष्ट्रातील प्रेक्षकांना पहायला मिळाला.

नागाची रक्षा करण्यासाठी ऋषी आस्तिक मुनी यांनी श्रावण शुद्ध पंचमीला यज्ञ करून नागांचे रक्षण केले. त्यामुळे तक्षक नाग बचावल्यामुळे नागवंशाचे संरक्षण झाले. आगीच्या धगीपासून बचावासाठी ऋषींनी नागावर कच्चे दूध टाकले तेव्हापासून नागपंचमी साजरी करण्यास सुरुवात झाली अशी दंतकथा आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने आपली मनोकामना पूर्ण होते. पावरा आणि कालापासून नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. नागदेवतेची आराधना केल्याने ज्योतिष शास्त्रानुसार सर्वांना त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. सुखसमृद्धी, खुशाली प्राप्त होते. नागाची पूजा केल्यामुळे सापापासून कोणत्या प्रकारचे भय राहत नाही ना कुंडलीतील कालसर्प दोष काबूत येतो अशी मान्यता आहे.

 बत्तीस  शिराळा येथील नागपंचमी प्रसिद्ध आहे. बत्तीस शिराळा हे गाव सांगली जिह्यात असून कोल्हापूरपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव सापासाठी प्रसिद्ध आहे. देशभरात आणि परदेशातही हे गाव प्रसिद्ध होते. नागपंचमीच्या अगोदर जिवंत नाग पकडले जात होते. साप पकडताना त्यांना इजा झाल्याने नाग पकडण्यावर 1994 सालापासून कोर्टाने बंदी आणली आहे. शिराळा राजवटीत हे गाव येत असल्याने गावाचे नाव पडले.

रामदास स्वामींनी जी 11 हनुमानाची मंदिरे स्थापन केली, त्यातील एक मंदिर या गावात आहे. तसेच अंबाबाई हे ग्रामदैवत येथे आहे. गोरक्षनाथांचे वास्तव्य येथे होते. त्यामुळे गोरक्षनाथाचे मंदिरही आहे. दर बारा वर्षांनी गोरक्षनाथाची यात्रा भरते. त्यामुळे नाथ पंथातील अनेक जण येथील यात्रेस येतात. एकदा गोरक्षनाथ या गावात भिक्षा मागत असताना एका घरापाशी आले आणि त्यांनी भिक्षा मागितली, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. नंतर काही वेळाने गृहलक्ष्मी बाहेर आली. ती म्हणाली महाराज मला क्षमा करा. मी नागाची पूजा करत होते. त्यावर महाराज म्हणाले, मी जिवंत नाग देतो. त्याची पूजा कर. तेव्हापासून जिवंत नागाची प्रथा पडली अशी कथा आहे. नागपंचमीला स्त्रिया वारुळाचीसुद्धा पूजा करतात. तसेच ग्रामीण भागात झाडांना झोके बांधून स्त्रिया या सणाचा आनंद लुटतात.

बत्तीस शिराळा येथील अंबाबाईचा कौल मिळाल्यानंतर गावकरी नाग पकडण्यासाठी बाहेर पडतात. जमिनीवर पडलेले खवल्यांचे ठसे पाहून नागाच्या बिळाचा शोध घेतला जातो. नंतर बीळ खोदून त्या बिळातून नागाला अलगद इजा न करता बाहेर काढले जात असे. त्याला एका पोत्यात जेरबंद करून पकडले जात असे. नंतर एका मडक्यात नागाला बंद करून त्यावर फडके बांधले जात असे. लहान मुलापासून मोठय़ापर्यंत नागाला सहजपणे हाताळले जात असे. नागपंचमीला घरोघरी जिवंत नागाची पूजा केली जात असे. नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी बैलगाडीतून नागाची मिरवणूक अंबाबाई देवळात येत असे. हजारो लोक हा नागपंचमीचा सोहळा पाहण्यासाठी इथे जमत असत. हा सोहळा इतिहासजमा झाला आहे. आता फक्त स्मृती उरल्या आहेत.

-1973 मध्ये म्हणजे बरोबर पन्नास वर्षांपूर्वी मी दूरदर्शनमध्ये असताना बत्तीस शिराळा येथील नागपंचमीच्या सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी गेलो होतो. दोन दिवस अगोदर मुक्काम केला होता. त्यावेळी इस्लामपूरजवळील शाहीर सूर्यवंशी माझ्या ओळखीचे होते. त्यांनी मला मदत केली होती. मी आणि यशवंत कडोलकर सहकुटुंब बत्तीस शिराळय़ाला गेलो होतो. इस्लामपूरला मी मुक्काम केला होता. नाग पकडण्यापासून ते सर्व प्रािढया चित्रित केल्या होत्या. गावकऱयांनी खूप सहकार्य केले. त्यामुळे हे सर्व करता आले. सुमारे 28  मिनिटांचा लघुपट तयार केला होता. त्यावेळी फिल्म कॅमेरा होता आणि ते माध्यम कृष्णधवल होते. दूरदर्शनचे संकलक म्हणजेच एडिटर चंद्रशेखर कामुलकर यांनी माझ्याबरोबर बसून अतिशय कष्टाने आणि नावीन्यपूर्ण अशी ती फिल्म बनवली होती. त्याला उचित असे निवेदन तसेच योग्य ते बॅकग्राऊंड म्युझिक लावून चांगला कार्पाम मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित केला होता.

प्रथमच असा नागपंचमी सोहळा महाराष्ट्रातील प्रेक्षकांना पहायला मिळाला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने त्यावेळी यावर एक लेख लिहून माझ्या कार्पामाची प्रशंसा केली होती नागपंचमीच्या सणानिमित्त त्याची आठवण आली ते चित्रीकरण मी कधीही विसरणार नाही. कारण एक उत्तम कार्पाम मी एक वर्षाच्या आत दूरदर्शनवर प्रसारित केला होता.

(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत)