
मलबार हिल येथे इको प्रेंडली पाथवेमुळे मॉर्निंग वॉकला येणाऱयांस मुंबईकरांसाठी अत्यंत सुखकारक सुविधा निर्माण होणार होती. शिवाय या उपक्रमामुळे नैसर्गिकरीत्या असणाऱया वनस्पतींचेही जतन होणार होते. त्यामुळे या ठिकाणी आपल्या संकल्पनेतून नियोजित असलेल्या प्रकल्पावरील स्थगिती उठवावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना पत्र दिले आहे.
मलबार हिल परिसरामध्ये 2021 ला आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेल्या सिरी रोड पादचारी इको प्रेंडली पाथवे प्रकल्पाला सध्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी स्थगिती दिली आहे. मलबार हिल परिसरासाठी हा प्रकल्प अत्यंत चांगला पर्यावरणपूरक प्रकल्प होता. विशेषतः मॉर्निंग वॉकला येणाऱया माणसांसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार होता. हा प्रकल्प पर्यावरणपूरक व नागरिकांसाठीही उपयुक्त होता. असे असताना या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा आपण घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
जागा बिल्डरला देणार का?
– नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱया प्रकल्पाला स्थगिती दिल्यामुळे सदर जागा मिंधे सरकार आपल्या जकळच्या एखाद्या बिल्डरला देणार का, अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
– या प्रकल्पावरील स्थगिती उठवून हा प्रकल्प पर्यावरणाची काळजी घेऊन नैसर्गिक पाथके विकसित करणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकल्पाकरील स्थगिती उठवावी.



























































