
पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने मुंबईत आज धडक कारवाई सुरू केली असली तरी ग्राहकांनी मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने पहिल्याच दिवशी प्लॅस्टिक बंदीची ऐशी की तैशी झाली. पहिल्याच दिवशी दुकानदार, फेरीवाले आणि आस्थापनांवर केलेल्या कारवाईत पालिकेने प्रत्येकी पाच हजार या प्रमाणे 2 लाख 95 हजारांचा दंड वसूल केला. तर 59 प्रकरणात 87.365 किलो प्लॅस्टिक जप्त केले, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्य सरकारने महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकोल (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचना, 2018 प्रकाशित केली आहे. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही अधिसूचना व सुधारणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे. या अधिसूचनेनुसार एकल वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लॅस्टिक कस्तू उत्पादन, वापर, काहतूक, कितरण, घाऊक आणि किरकोळ किक्री आणि साठकणूक याकर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय केंद्र शासनानेही सिंगल यूज प्लॅस्टिक अधिसूचना 12 ऑगस्ट 2021 रोजी प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र प्लॅस्टिक क थर्माकोल अधिसूचना 2018 आणि केंद्रीय शासनाची सिंगल यूज प्लॅस्टिक अधिसूचना 2021 अंतर्गत प्रतिबंधित वस्तूंचे उत्पादन, उपयोग, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठकणीला बंदी आहे. पालिका कार्यक्षेत्रात पर्याकरण विभागाच्या सुचनेनुसार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस खात्यासोबत समन्कयाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्लॅस्टिकविरोधी मोहीम तीव्र केली आहे. यामध्ये आज दिवसभरात 1 हजार 159 आस्थापनांना भेटी देण्यात आल्या.
– पालिकेचे तीन कर्मचारी, पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱयांसह सुरू केलेल्या कारवाईत पहिल्याच दिवशी 1 हजार 159 ठिकाणी भेटी देऊन दुकानदार, फेरीवाले आणि आस्थापनांकडून प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे 2 लाख 95 हजारांचा दंड वसूल करण्यात आला, तर 59 प्रकरणांत 87.365 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
…तर 25 हजारांचा दंड
पालिकेकडून करण्यात येणाऱया कारवाईत उत्पादक, साठेदार, पुरवठादार, किक्रेते यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याकर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम 2006 च्या कलम 9 अन्वये पहिल्या गुह्यासाठी 5 हजार रुपये, दुसऱया गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये आणि त्यानंतरच्या गुह्यांसाठी 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास व 25 हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे. या कारवाईत पहिल्या टप्प्यात दुकानदार, फेरीवाले, उत्पादक-वितरांकांवर कारवाई करण्यात येणार असून ग्राहकांमध्ये जनजागृती करून सूचना देण्यात येणार आहे.



























































