
हुकूमशाही सत्ताधारी भाजपच्या विरोधात हिंदुस्थानातील वेगवेगळ्या पक्षांना एकत्र आणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 23 जून रोजी विरोधकांची मोट बिहारमधील बैठकीतून बांधली होती. जी आता ‘इंडिया’ महाआघाडीच्या नावाने जोमात काम करीत आहे. या महाआघाडीची पुढील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये होत आहे. या बैठकीआधीच संयुक्त जनता दलाने (जेडीयू) हिंदुस्थानातील 18 प्रदेशाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे. तसेच काही राज्यात प्रदेश संयोजकाच्या नावाचीही घोषणा केली आहे.

























































