
तमिळनाडूतील मदुराई येथे टूरिस्ट ट्रेनला भीषण आग लागली आहे. रेल्वे स्थानकाजवळ उभ्या पुनालूर-मदुराई एक्सप्रेसला (Punalur-Madurai Express) ही आग लागली असून या आगीत 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच 25हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
प्राथमिक माहितीनुसार, केरळच्या पुनालूरहून रामेश्वरकडे निघालेल्या एक्सप्रेस ट्रेनला शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी आग लागली. ही ट्रेन मदुराई रेल्वे स्थानकाजवळ थांबलेली असताना पर्यटकांच्या एका बोगीने अचानक पेट घेतला. क्षणात आगीने संपूर्ण बोगी कवेत घेतल्याने अनेक प्रवाशांना बाहेरही पडता आले नाही. या आगीमध्ये होरपळून 9 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, दक्षिण रेल्वेकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची तात्काळ मदत जाहीर करण्यात आली आहे.
Tamil Nadu train fire | An ex-gratia of Rs 10 lakh announced to the family of the deceased: Southern Railway. https://t.co/MgXuD4CDir
— ANI (@ANI) August 26, 2023
सकाळच्या सुमारास एक्सप्रेस ट्रेनच्या एका बोगीला आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण बोगीला वेढा घातला होता. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात संपूर्ण बोगी जळून खाक होताना दिसतेय.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागलेली बोगी खासगी होती. ही बोगी नागरकोईल जंक्शनजवळ टूरिस्ट ट्रेनला जोडण्यात आली होती. या बोगीतून प्रवास करणारे प्रवासी अवैधरित्या गॅस सिलिंडर घेऊन जात होते. गॅस गळती झाल्याने बोगीला आग लागली. या बोगीव्यतिरिक्त इतर कोणत्याही बोगीचे आगीमुळे नुकसान झालेले नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट असून त्याचा तपास सुरू आहे.
View this post on Instagram
बालासोर दुर्घटनेत 293 प्रवाशांचा मृत्यू
मदुराईतील रेल्वे दुर्घटनेमुळे अनेकांना बालासोरच्या घटनेची आठवण झाली. ओडिसातील बालासोरजवळ कोरोमंडळ एक्सप्रेसला झालेल्या भीषण अपघातामध्ये 293 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

























































