
कधी कधी चेहऱ्यावर आणि पाठीवर मुरुमे, काळे डाग किंवा त्वचेच्या इतर समस्या येऊ शकतात. त्यांची योग्यरीत्या काळजी घेतली नाही, तर कालांतराने ही समस्या अधिकच बिकट होऊ शकते, परंतु या समस्यांपासून सुटका होण्यासाठी ते आयुर्वेदातील नैसर्गिक उपचारांचा वापर करू शकतात.
तुमच्या पाठीवर पुरळ येणे ही अशी गोष्ट आहे, जी बऱ्याच लोकांना होते. विशेषतः तेलकट त्वचा आणि बद्धकोष्ठता असेल, पण यामुळे इच्छा असतानाही काही जणी बॅकलेस आऊटफिट परिधान करणे टाळतात. तुम्हीदेखील याच कारणामुळे त्रस्त आहात का? या समस्यांवर वेदिक्युअर येथील डॉ. सायली मोदी यांनी काही नैसर्गिक उपाय सांगितले आहेत.
मुरुमे येण्यामागील कारणे Š महिलांच्या पाठीवर आणि खांद्यावर पुरळ येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे आपण मोठे होतो तेव्हा आपल्या शरीरात बदल होतात, ज्यामुळे आपली हार्मोन्स वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. हे संप्रेरक बदल आपल्या त्वचेवर परिणाम करू शकतात आणि ती अधिक तेलकट बनवू शकतात. आपण त्वचेची योग्य काळजी घेतली नाही, तर त्यामुळे मुरुमांसारख्या समस्या उद्भवू शकतात.या समस्या टाळण्यासाठी आपली त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवणे खरोखरच महत्त्वाचे आहे. दुसरे कारण म्हणजे तेलकट त्वचादेखील अधिक नाजूक असू शकते. याचा अर्थ तिला सहजपणे दुखापत किंवा ती खराब होऊ शकते. म्हणूनच जर आपली त्वचा तेलकट आणि संवेदनशील असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
त्वचेवर लावा कडुलिंबाचा पाला आणि तुळशीचा लेप
मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे हर्बल लेप. लेप तयार करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा एक छोटा गुच्छ, सुमारे 15 ते 20 तुळशीची पाने आणि 15 ते 20 पुदिन्याची पाने घ्या. ही सर्व पाने एका भांडय़ात ठेवा. पानांमध्ये गुलाबपाणी घालून ब्लेंडरमध्ये ठेवा. पेस्ट तयार करण्यासाठी त्यांना एकत्र मिसळा. त्यानंतर पेस्टमध्ये 1/4 चमचे हळद आणि एक चमचा कोरफड जेल घाला.
हर्बल पेस्ट बनवल्यानंतर ती तुमच्या पाठीवर आणि खांद्यावर योग्य प्रकारे लावा. 25 ते 30 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करा. पेस्टमध्ये काही खास गोष्टी असतात, ज्यामुळे तुमच्या पाठीवरची मुरुमे आणि डाग दूर होण्यास मदत होते. हे आठवडय़ातून दोनवेळा करा. तुमच्या त्वचेसाठी कोणतेही उपचार करण्यापूर्वी त्वचा तज्ञांशी बोलणे महत्त्वाचे आहे. इतर लोक त्यांच्या त्वचेसाठी काय करतात याची कॉपी करू नका. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते आणि त्यांच्या समस्या वेगळ्या असतात.
>> मृणाल घनकुटे




























































