पुरवणी परीक्षांचा निकाल – दहावी, बारावी परीक्षेत मुंबई तळाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शिक्षण मंडळाकडून जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात दहावीच्या निकालात एक टक्क्याहून अधिक घसरण झाली आहे. तर बारावीचा निकाल काही अंशाने घटला आहे. तर या दोन्हीही परीक्षेमध्ये मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे.

दहावीच्या परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून 45 हजार 166 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 13 हजार 487 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 29.86 टक्के इतका लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या निकालात एक टक्क्याहून अधिक घसरण झाली आहे.