ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, हेमा मालिनीच्या वक्तव्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकिकडे ओटीटी प्लॅटफॉर्म्सने मनोरंजन जगात धुमाकूळ घातला आहे. ओटीटी बघणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे धास्तावलेलं बॉलिवूड नुकतंच कुठे स्थिरावलेलं पाहायला मिळत आहे. पण, ओटीटी म्हणजे निव्वळ टाईमपास असल्याचं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी केलं आहे.

सनी देओल याचा गदर 2 आणि शाहरुख खान याचा पठाण यांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. कोरोना काळापासून चित्रपटसृष्टीला आलेल्या मरगळीला झटकण्याचं काम या चित्रपटांमुळे झालं. या दोन्ही चित्रपटांचं कौतुक हेमा मालिनी यांनी केलं आहे. हे दोन्ही चित्रपट यशस्वी होण्यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं.

त्या म्हणाल्या की, प्रेक्षकांना चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला आवडतात. ओटीटी प्लॅटफॉर्म्स हे फक्त टाईमपास म्हणून पाहिले जातात. मोठ्या पडद्यावरचे चित्रपट वेगळे असतात. त्याची आपल्याला सवय आहे. मी स्वतः मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहणं पसंत करते. त्यामुळे ओटीटी आणि वेबसीरीज टाइमपाससाठी चांगल्या आहेत. पण, त्या किती वेगळ्या आहेत ते मी सांगू शकत नाही. म्हणूनच गदर 2, पठाण जेव्हा मोठ्या पडद्यावर झळकले, तेव्हा ते सगळे हिट झाले. लोकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहायला आवडतात, असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.