जगाच्या पाठीवर- जगातील पहिला मानवी टॉवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राकेश थोरात

 

 

 

आपल्याकडे जसा माणसांचा समूह एकावर एक उभे राहून दहीहंडी करतात तसे प्रकार जगात काही देशांत आहेत. स्पेन या देशात असे मानवी टॉवर तयार करतात त्या ‘कॅसल’ टॉवर्सना जागतिक हेरिटेज म्हणून मान्यता दिली गेली आहे.

असे माणसांवर माणसे, दहीहंडीसारखे उभे राहून टॉवर्स बनविण्याची सुरुवात स्पेनमध्ये 1712 मध्ये झाली. पण मधल्या काळात ते थोडे कमी झाले आणि 1960 आणि 1970 च्या दरम्यान पुन्हा स्पेनमध्ये असे मानवी टॉवर्स उभे करण्यास सुरुवात झाली. त्याच काळात असे मानवी टॉवर्स उभारण्यात महिलांनीही भाग घेण्यास सुरुवात केली. स्पेनमध्ये असे नऊ ते दहा थरांचे ‘कॅसल’ बनविले जातात. 1992 च्या उन्हाळी ऑलिंम्पिकमध्ये बार्सिलोनो येथे अशा मानवी टॉवर्सची ‘कॅसेल’ची प्रात्यक्षिके जगाने पाहिली. बार्सिलोना शहरापासून 40 कि. मी. असलेल्या वॉल्स या गावात असे टॉवर्स बनविण्याची सुरुवात 1712 च्या दरम्यान आली. बार्सिलोना हे शहर स्पेन या देशात आहे