प्रज्ञानचा नाबाद 100 मीटर प्रवास, आता स्लीप मोडमध्ये जाणार; इस्रोने दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रयानच्या प्रज्ञान रोव्हरने शिवशक्ती या लँडिंग पॉईंटवरून 100 मीटर इतक्या अंतरावर वाटचाल केली आहे. इस्रोने लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्या दरम्यान 100 मीटरचं अंतर असल्याची माहिती दिली आहे. आता तो लवकरच स्लीप मोडमध्ये जाणार असल्याचंही इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.

प्रज्ञान रोव्हरने आतापर्यंत 101.4 मीटर इतकं अंतर पार केलं आहे. विक्रम लँडर हा 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरला होता. त्यानंतर 10 दिवसांत प्रज्ञान रोव्हरने हे अंतर पार केलं आहे. आधी तो लँडरच्या पश्चिमेला जात होता मात्र आता त्याने आपली दिशा बदलून उत्तरेला चालायला सुरुवात केली आहे.

आता लूनर नाईट नजीक असल्याने विक्रम लवकरच स्लीप मोडमध्ये जाणार आहे. लूनर नाईट म्हणजे 14 दिवसांचा असा टप्पा, जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत नाही. त्यामुळे प्रज्ञान संशोधन करू शकणार नाही. त्यामुळे तो स्लीपमोडमध्ये जाणार आहे. कारण, चंद्रावर आता रात्र उजाडणार असून तिकडचं तापमान -100 अंश सेल्सियस इतकं होणार आहे. त्यामुळे विक्रम आणि प्रज्ञानला सौरऊर्जा मिळणार नाही. त्यांना त्यासाठी त्यांच्या जवळ असलेली ऊर्जा पुढील 14 दिवसांपर्यंत जपून ठेवावी लागेल. त्यासाठीच स्लीप मोड सुरू होणार आहे.