
सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘टायगर 3’चे पोस्टर रिलीज झाले आहे. चाहत्यांना सरप्राइज देत सलमान खानने त्याच्या सोशल मिडीया हँडलवर यशराज बॅनरच्या स्पाय थ्रिलर फ्रेंचायजी म्हणजेच ‘टायगर 3’ या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर शेअर केले आहे. टायगर आणि झोयाच्या कथेचा तिसरा अध्याय असलेला ‘टायगर 3’ दिवाळीमध्ये प्रदर्शित होईल.
हे पोस्टर शेअर करीत हा यशराजच्या आधीच्या स्पाय थ्रिलर ‘वॉर’ आणि ‘पठाण’सारखा पॅन इंडिया चित्रपट असेल अशी माहितीही सलमानने दिली आहे. ‘टायगर 3’ हा लोकप्रिय वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. ‘पठाण’ चित्रपटात सलमान खानचा कॅमिओ दिसला होता आता ‘टायगर 3’मध्ये शाहरुख खानचा कॅमिओ आपल्याला दिसणार आहे. ‘टायगर 3’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची कमान प्रसिद्ध दिग्दर्शक मनीष शर्मा यांनी सांभाळली आहे.



























































