‘आरे’ तलावात विसर्जनाला बंदी घालण्याचा डाव कुणाचा, शिवसेनेचे ‘जन आक्रोश’ आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरण संवेदनशील सनियंत्रण समितीच्या झालेल्या बैठकीत ‘आरे’ तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी घालण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. असे असताना अचानक ‘आरे’ तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी घालण्याचा डाव नक्की कुणाचा आहे, असा सवाल करीत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ‘जन आक्रोश’ आंदोलन करीत सरकारचा निषेध केला. ‘आरे’ तलावात मूर्तींना विसर्जनाला बंदी घालणारे सरकार हिंदूविरोधी आहे का, असा सवाल या वेळी शिवसेनेकडून करण्यात आला.

‘आरे’ तलावात दरवर्षी छोट्या मूर्तींसह एक हजारांवर मोठय़ा मूर्तींचे विसर्जन केले जाते. असे असताना या वर्षी अचानक ‘आरे’ तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मूर्ती विसर्जनाचा मोठा प्रश्न भाविकांसमोर निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेसह राज्य सरकारकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आलेला असताना कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे ‘जन आक्रोश’ आंदोलनाच्या वेळी आमदार रवींद्र वायकर यांनी सांगितले. या वेळी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा या मागणीकरिता आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते ‘आरे’ तलावात श्रीफळ अर्पण करण्यात आले. या वेळी आमदार सुनील प्रभू यांचेही भाषण झाले.

या वेळी सार्कजनिक गणेशोत्सक मंडळ उपनगर समितीचे अध्यक्ष विनोद घोसाळकर, उपनेते व युवासेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर व विभाग संघटक साधना माने, काँग्रेसचे सुनील कुमरे, महिला विभाग संघटक साधना माने, समीर देसाई, विश्वनाथ सावंत, रचना सावंत, शालिनी सावंत, सुर्वे, रेखा रामवंशी, बाळा नर, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बाबा साळवी, वैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, जयवंत लाड, बाळा साटम, शाखाप्रमुख मंदार मोरे, संदीप गाढवे, बाळा तावडे, अमर मालकणकर, सुगंधा  शेटय़े, रश्मी भावसार, नीलाक्षी भाबल, प्रियंका आंबोळकर, अपर्णा परळकर, हर्षदा गावडे, मयुरी रेकाळे, समिक्षा माळी, अमित पेडणेकर आंदोलनात सहभागी झाले होते.