भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमीन बळकविण्याच्या हेतूने कुटुंबीयास धमकी आणि त्रास दिल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे आदेश नगर जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. याबाबत बुऱहाणनगर येथील तुळजाभवानी मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी असलेले अभिषेक भगत यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.

भगत कुटुंब बुऱहाणनगरच्या तुळजाभवानी मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी आहेत. बुऱहाणनगर परिसरात त्यांच्या मालमत्ता, जमिनी आहेत. यातील काही जमिनी बळकविण्याच्या हेतूने शिवाजी कर्डिले व अक्षय कर्डिले हे भगत कुटुंबीयास त्रास देत असल्याचे अभिषेक भगत यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.