ठाण्यात मोठी दुर्घटना; 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.