स्टॉक मंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नरेश यावलकर

तुम्हाला शेअर बाजारात रस आहे, पण स्क्रीनसमोर बसण्यासाठी वेळ नाही आणि खूप पैसेही नाहीत अशा व्यक्तींनी खालील डेरीवेटिव्ह बाजारातील डावपेच आठवडय़ासाठी घेऊन ट्रेडिंग करावे.

11 सप्टेंबर 2023 ला एशियन पेंटमध्ये आयरन कोंडार घ्या.

आयरन कोंडार हे डावपेचामध्ये बाजार समांतर दिशेमध्ये असताना घ्यावे.

8 सप्टेंबर 2023चा बंद भाव रु. 3238.

दिशा- जवळपास 24 ऑगस्ट 2023 पासून एशियन पेंट एका रेंजमध्ये आहे.

जवळचा रेसिस्टन्स 3300 व दूरचा रेसिस्टन्स 3360 आहे. जवळचा सपोर्ट 3200 आहे व दूरचा सपोर्ट 3140 आहे.

हा ट्रेड 28 सप्टेंबर 2023 च्या समाप्तीचा असल्याने, हा ट्रेड यशस्वी होईल असे वाटते.

समाप्ती- 28 सप्टेंबर 2023, लॉट 200
स्ट्राईक 3300 चा कॉल विका रु. 35
स्ट्राईक 3360 चा कॉल विकत घ्या रु.19
स्ट्राईक 3200 चा पुट विका रु. 31.50
स्ट्राईक 3140 चा पुट विकत घ्या रु. 14.85
नफा जास्तीत जास्त रु. 6490
तोटा जास्तीत जास्त रु. 5510
इन्व्हेस्टमेंट रु. 60000
दिनांक 11 सप्टेंबर 2023ला सर्व ऑपशन्सचा भाव बदललेले असतील तरी आयडिया लागू आहे. जर सकाळी 9.45 वाजेपर्यंत निफ्टी व एशियन पेंटमध्ये खूप मंदी किंवा तेजी असल्यास ट्रेड घेऊ नये.

– आपापल्या सहनशक्ती नुसार व्यवहार बंद करावा.
– उदाहरण – संकल्पना समजाउन सांगण्यासाठी घेतलेले आहे.
– वाचकांनी लेखकाचा हा सल्ला समजू नये.
– सविस्तर कारणमीमांसा YouTube channel ‘prime academy’ वर पाहा.

(शेअर मार्केट मार्गदर्शक) primetechnicals.com