
गणेशोत्सवात कार्यक्रमांसाठी पाच दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी या वर्षी किमान चार दिवस तरी परवानगी देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली असताना गणेशोत्सव चार दिवसांवर आला असताना अद्याप कोणताही निर्णय दिला नसल्याने मंडळांसह भाविकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने याबाबत चार दिवस परवानगी देण्याचे निर्देश मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकाऱयांना तातडीने द्यावेत, अशी मागणीही समन्वय समितीकडून करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून किमान पाच दिवस तरी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र असलेल्या एकूण चार दिवसांतील एक दिवस कमी केल्याने मंडळांकडून नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सरकारसोबत 4 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत आश्वासन देऊनही अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे समन्वय समितीने म्हटले आहे.

























































