
नाशिक सुसंस्कृत आणि तीर्थक्षेत्र म्हणून देशात ओळखले जाते. आज ते पंजाब आणि गुजरात प्रमाणे “उडते नाशिक” झाले आहे काय ? असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नेते संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. या संदर्भात संजय राऊत थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत गोप्यस्फोट करणार आहेत.
नाशिक सुसंस्कृत आणि तीर्थक्षेत्र म्हणून देशात ओळखले जाते. आज ते पंजाब आणि गुजरात प्रमाणे “उडते नाशिक” झाले आहे काय ?गुन्हेगारी आणि नशेच्या विळख्यात सापडलेल्या नाशिकला त्या दुष्टचक्रातून सोडवावे लागेल. उडते नाशिक ला जबाबदार कोण? नाशिक मधील गुन्हेगार आणि नशेच्या माफियांना कोण पाठीशी घालत आहे? गृहमंत्री चूप का आहेत?नाशिकचे चित्रं भयंकर आहे. आज 11 वाजता पत्रकार परिषद : शिवसेना स्वस्थ बसणार नाही!, असं राऊत यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.





























































