माझ्या इतर भूमिकाही लक्षात ठेवाव्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या सात-आठ वर्षांत मी वेगवेगळय़ा जॉनरच्या भूमिका साकारल्या तरी सुरुवातीच्या काळात मी केलेल्या रोमॅण्टिक भूमिकांमुळे ‘सीरियल किसर’ हीच माझी ओळख बनली आहे. किसिंग सीनमुळे मला लोक लक्षात ठेवत असतील तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही, असे इम्रान हाश्मी याने ‘सेल्फी’ या चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजननिमित्त दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

– ‘सेल्फी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होतोय, त्याबद्दल काय सांगशील?

– आपली कलाकृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. टेलिव्हिजन हे माध्यम घराघरांत पोहोचले आहे. त्यामुळे स्टार गोल्ड वाहिनीवर उद्या रविवारी रात्री 8 वाजता होणाऱया वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरसाठी मी खूप उत्सुक आहे. यात मी एका आरटीओ अधिकाऱयाची भूमिका साकारली आहे. जो एका सुपरस्टारचा खूप मोठा फॅन आहे. सेल्फीवरून चाहता आणि फॅन यांच्यातील वाद कसे विकोपाला पोहोचतात हे यात दाखवले आहे.

– खऱया आयुष्यात सेल्फीवरून तुझा एखाद्या चाहत्यासोबत वाद झाला आहे का?

– अजिबात नाही. 10 ते 15 वर्षांपूर्वी चाहते कलाकारांचा ऑटोग्राफ घ्यायचे. आता प्रत्येक चाहत्याला सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी कलाकारांसोबत सेल्फी हवी असते. चाहत्यांशिवाय कोणताही कलाकार अधुरा असतो. उलट ज्या दिवशी चाहते आमच्यासोबत सेल्फी घ्यायला येणार नाहीत, त्या दिवशी आम्हाला चुकल्यासारखे वाटेल.

– अजूनही ‘सीरियल किसर’ म्हणूनच चाहते तुला ओळखतात, याची खंत वाटत नाही का?

– गेल्या सात-आठ वर्षांत मी वेगवेगळय़ा
जॉनरच्या भूमिका साकारून स्वतःला सिद्ध केले आहे. तरी सुरुवातीच्या काळात मी साकारलेल्या
रोमॅण्टिक भूमिकांमुळे माझी विशिष्ट छबी चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. गमतीत ‘सीरियल किसर’ मला म्हटले जाते. त्याचे मला वाईट वाटत नाही. उलट कॉम्प्लिमेंट म्हणून मी त्याच्याकडे बघतो.

– तुझ्या ड्रीम रोल बद्दल सांग..

.
– खरे तर माझ्या वाटय़ाला येणारी प्रत्येक भूमिका माझ्यासाठी ड्रीम रोलप्रमाणे असते. त्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा माझा प्रयत्न असतो.
– आगामी प्रोजेक्टबद्दल सांग…
– सलमान खानसोबत मी ‘टायगर 3’ मध्ये झळकणार आहे, पण त्या भूमिकेबद्दल आताच काही सांगू शकत नाही. याशिवाय ‘ओजी’ आणि ‘ग्राऊंड झिरो’ या चित्रपटातदेखील मी झळकणार आहे. ‘ओजी’ या चित्रपटातून मी साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करतोय.