मोदींच्या ओबीसी असल्याच्या दाव्याबद्दल जदयूला शंका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबीसी असल्याच्या दाव्याचे भांडे फुटेल या भीतीनेच मोदी सरकार जातनिहाय जनगणनेसाठी तयार नसल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जद (सं.)ने केला आहे.

जद (संयुक्त)चे आमदार आणि मुख्य प्रवक्ते नीरज कुमार यांनी पक्षाच्या येथील मुख्यालयात एका पत्रकार परिषदेत वरील आरोप केला. अतिपिछडा (अति मागासवर्गीय जमाती) जमातीतील असल्याच्या मोदी यांच्या दाव्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी त्यांची मोध घांची ही जात 2002मध्ये ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून घेतल्याचा आरोप मोदींवर केला गेला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले.