सिंदगीमध्ये मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणास बसलेल्या एका उपोषणार्थीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणार्थीचा उपोषणाच्या ठिकाणी भोवळ आल्याने मृत्यू झाला. सदर घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. प्रकाश नामदेवराव मगर (53) असे उपोषणार्थीचे नांव असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले.

कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु करण्यात आले होते. आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला मुदत देऊन आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर सिंदगी येथेही आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र, साखळी उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला होता. त्यानुसार गावात दररोज 5 पुरुष व 25 महिला साखळी उपोषणाला बसत आहेत. सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत हे उपोषण केले जात आहे. दरम्यान, आज शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उपोषणार्थीपैकी प्रकाश मगर यांना अस्वस्थ वाटू लागले होते. अचानक त्यांना भोवळ आल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने पोतरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले? होते. मात्र, वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. मयत प्रकाश मगर यांच्या पश्?चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर घटनेमुळे सिंदगी गावावर शोककळा पसरली आहे.