स्वस्तिक हे द्वेषाचं चिन्ह, जस्टिन ट्रु़डोंच्या विधानाने संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे वारंवार हिंदुस्थान विरोधी वक्तव्य करत आहेत. हिंदुंच्या स्वस्तिक चिन्हावरून वादग्रस्त आणि संतापजनक विधान केलं आहे. एक्स या समाज माध्यमावर ट्रुडो यांनी हे विधान केलेलं आहे.

त्यांच्या ट्वीटनुसार, जेव्हा आम्ही द्वेषयुक्त भाषा वाचतो किंवा कल्पनेला सामोरे जातो, तेव्हा आपल्याला त्याचा निषेध केला पाहिजे. पार्लमेंट हिलवर एखाद्या व्यक्तिने स्वस्तिक घेऊन आंदोलन करणं निषेधार्हच आहे. कॅनडातील नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने निदर्शन करण्याचा अधिकार आहे. पण, ज्यूविरोधी भावना, इस्लामोफोबिया किंवा कोणत्याही प्रकारच्या द्वेषाला थारा देऊ शकणार नाही, असं ट्रुडो म्हणाले आहेत.

सोशल मीडियावर ट्रुडो यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. स्वस्तिक हे पावित्र्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. तर नाझींचं चिन्ह असलेलं हेकेनक्रुझ (उलटा स्वस्तिक) हे द्वेषाचं प्रतीक आहे, अशा भाषेत ट्रुडो यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.