विद्युत वाहने आणि पर्यावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रंगनाथ कोकणे

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जगभरात जिवाश्म इंधनाचे ज्वलन किमान पातळीवर आणण्यावर भर दिला जात आहे. यासाठी विजेवर चालणाऱया वाहनांच्या प्रसारावर सर्वच देशभर देत आहेत. त्याचा पर्यावरणावरील परिणाम हा कोणत्या प्रकारच्या विजेपासून चार्ंजग केले जाते यावर अवलंबून आहे. बहुतांश देशातील वीज ही सध्या पर्यावरणस्नेही नाही. कोळशावर आधारित वीज निर्मिती पेंद्रे प्रदूषणकारी आहेत. त्यामुळे पर्यावरणासाठी ईव्ही हा शेवटचा पर्याय नाही.

भारताने 30 टक्के खासगी मोटारी, 70 टक्के व्यावसायिक मोटारी तसेच 80 टक्के दोन आणि तीन चाकी वाहने 2030 पर्यंत विजेवर चालविण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय पेंद्र सरकारने निश्चित केले आहे. हे ध्येय गाठण्यासाठी सरकार ई-व्हेईकलच्या खरेदीदारांना आणि निर्मात्यांना अनेक प्रकारचे प्रोत्साहन देत आहे. यात अंशदान, करात सवलत आदी गोष्टींचा समावेश आहे. जगभरात वाहन निर्माते हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या सरकारला ईव्हीच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी दबाव आणत आहेत. वास्तविक ईव्ही हे पर्यावरणपूरक आहेत का? अर्थात ईव्हीचे इंजिन हे पारंपरिक वाहनांच्या तुलनेत अधिक पर्यावरणपूरक असले तरी त्याचाही पर्यावरणावर नकारात्मक परिणाम पडतो.

बॅटरी हा ईव्हीचा महत्त्वाचा भाग आहे. निर्मिती करताना प्रत्येक बॅटरीमागे किलोवॉट प्रतितास (केडब्लूएच) 150 किलो सीओटू सोडला जातो. एक सरासरी ईव्ही प्रति किलोमीटर 0.20 केडब्लूएच खर्च करते आणि 300 किलोमीटरपर्यंत चालणाऱया चांगल्या ईव्हीसाठी बॅटरीची क्षमता 60 केडब्लूएच असणे अपेक्षित आहे. याचाच अर्थ नऊ टन अतिरिक्त ‘सीओटू’ उर्त्सजन केले जात असून त्यामुळे ईव्ही ही ‘आयसीई’ मोटारएवढीच पर्यावरणाला हानीकारक ठरू शकते. यानुसार ईव्हीच्या निर्मतीत अधिक उत्सर्जन दिसते आणि चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करणे हा एकमेव मार्ग आहे. त्याचबरोबर ईव्हीमार्फत विषारी वायू सोडला जात नसला तरी बॅटरीमधील क्षमता कमी झाली की, त्या विषारी वायू सोडू शकतात. लिथियम बॅटरीमध्ये वापरले जाणारे जस्तासारखे तत्त्व हलके असते आणि त्यामुळे विद्युत प्रवाह वेगाने होतो. सध्याच्या काळात ऑस्ट्रेलियात लिथियम हा सर्वात मोठा पुरवठादार आहे. एकूण जागतिक साठय़ात बोलिव्हिया, चिली, अर्जेटिना हा ‘लिथियम त्रिकोण’ जगातील निम्म्या उत्पादनाला जबाबदार आहे. सध्याच्या काळात जागतिक पातळीवर लिथियम आयर्न बॅटरीच्या निर्मितीत चीनचा वाटा 77 टक्के असून जगातील सर्वात मोठय़ा दहा पंपन्यांपैकी सहा पंपन्या चीनमध्ये आहेत. भारत सध्याच्या काळात आपले संपूर्ण लिथियम ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिनावरून आयात करते आणि लिथियम आयन सेलची 70 टक्के गरज ही चीनकडून भागविण्यात येते. राजस्थान तसेच जम्मूत लिथियमचा साठा अलीकडेच सापडल्याने भारत भविष्यात या घटकाच्या उत्पादनात आघाडीचा देश ठरू शकतो.

लिथियमचे उत्खनन हे जोखमीचे आहे. त्यात मोठय़ा प्रमाणात ‘जीएचजी’चे उत्सर्जन होते. त्याचबरोबर प्रति टन लिथियम उत्खननासाठी 500.000 लिटर पाण्याची गरज भासते. लिथियमच्या उत्खननातील रसायन आणि जड धातूमुळे हवा आणि पाणी प्रदूषित होऊ शकते. 2019 मधील एका अभ्यासानुसार, लिथियम आणि आयर्न बॅटरीच्या उत्पादनातून पर्यावरणावर होणारा 40 टक्के परिणाम हा उत्खननाच्या माध्यमातूनच होतो. विशेष म्हणजे स्वच्छ ऊर्जा ही घाण खाणीतून निघते. ईव्ही बॅटरीत कोबाल्टचा बराच वापर होतो. जगातील एकूण साठय़ापैकी 70 टक्के साठा हा डेमोव्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो देशात आहे. हा जगातील सर्वात गरीब देश म्हणून म्हणून ओळखला जातो. त्याचे उत्खनन हे आधुनिक युगातील ‘गुलामगिरी’सारखेच आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकच नाहीत, तर महिला आणि चार वर्षांच्या मुलालादेखील गुलामाप्रमाणे कोबाल्ट उत्खननाच्या कामाला लावले जाते. ते आदिम काळातील औजारांचा वापर करत उत्खनन करतात. वास्तविक हे गुलामाप्रमाणे जगण्यास प्रवृत्त आहेत. एकुणातच ईव्हीसारख्या तंत्रज्ञानाने समाधान होत नसेल तर जगभरातील ईव्हीकडे होणारी धावपळ ही पृथ्वीतील दुर्मीळ खनिजांचा तुटवडा करण्यास हातभार लावेल. त़्याचबरोबर हे उत्खनन भू-राजकीय मुद्दय़ालादेखील जोडले गेले आहे. पर्यायी रूपातून हरित हायड्रोजन किंवा बायोफ्युएल सहजासहजी उपलब्ध होत नाही. जगभरात हायड्रोजनचे 99 टक्के उत्पादन हे जिवाश्म इंधनातूनच होते. तसेच बायोफ्युएलचे उत्पादन वाढल्याने खाद्यान्न उत्पादनाचे क्षेत्रफळ कमी राहू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईव्ही हे केवळ आपल्या ऊर्जा स्रोतापुरतेच ग्रीन आहे. त्याचा पर्यावरणावरील परिणाम हा कोणत्या प्रकारच्या विजेपासून चार्ंजग केले जाते यावर अवलंबून आहे. बहुतांश देशांतील वीज ही सध्या ‘ग्रीन’ किंवा पर्यावरणस्नेही नाही. यावरचा तोडगा म्हणजे विद्युत ग्रिडला पर्यावरणपूरक करणे आणि त्यास बराच काळ लागेल. त्या काळापर्यंत ईव्हीच्या वापरातून वातावरणात ‘जीएचजी’चे प्रमाण वाढेल. ग्रिडला शून्य कार्बन केल्यानंतरच त्यातील उत्सर्जन कमी राहील.

सध्याच्या काळात युरोपीय संघ एकूण 3200 टेरावॉट प्रति तास विजेची निर्मिती करते. अशा वेळी जगभरात भावी ईव्ही वाहनांना चार्ज करण्यासाठी संभाव्य शाश्वत आणि पारंपरिक ऊर्जेच्या मागणीची कल्पना करता येऊ शकते. त्यासाठी अतिरिक्त स्रोतांची गरज भासेल. बॅटरीची विल्हेवाटदेखील हवामानावर परिणाम करणारा घटक राहू शकतो. ऑस्ट्रेलियातील एका अभ्यासात म्हटले, ऑस्ट्रेलियात विविध ठिकाणी असलेल्या कचरा डेपोत निकामी बॅटऱयांचे प्रमाण 98 टक्के आहे. त्यामुळे कधीही अचानक आग लागण्याची शक्यता राहत आहे. विशेष म्हणजे ही आग बराच काळ राहू शकते. अशा प्रकारची आग कालांतराने सामान्य वाटू लागेल आणि ही बाब पर्यावरणाला हानीकारक आहे. शेवटी पर्यावरणासाठी ईव्ही हा शेवटचा पर्याय नाही. त्यावरचा तोडगा हा समाधानकारक जीवनशैली, गाडय़ांचा संतुलित वापर तसेच वाहतुकीच्या पद्धतीतील बदल यात आहे. पायी फिरणे, कार पुलिंग, सार्वजनिक वाहतूक सेवा आदीदेखील पर्याय आहेत. आपल्याला कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्था टिकवण्यासाठी आणि जगाचे पर्यावरण अबाधित राखण्यासाठी सर्व प्रकारच्या पद्धतीचा वापर करावा लागेल. त्यात तंत्रज्ञान अणि बिगर तंत्रज्ञानाच्या मार्गाचाही समावेश असेल.

(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)