
>> उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक
वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.
मी पुण्याजवळील मगरपट्टा परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याची सोय ऑनलाइन पाहत होतो. तेव्हा मला बोलण्यात गुंतवून ङ्खेवून एका मध्यस्थाने काही रक्कम गुगल पेने त्याला टप्याटप्याने द्यायला लावली. यात माझी फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर मी पैसे परत मागितले त्यास तो दाद देत नाही, आता हे पैसे मला परत कसे मिळतील? – यश पाटील, पालघर
उत्तर – आपली हकीकत सविस्तर वाचली. या प्रकरणात आपण स्वतःच्या मर्जीने पैसे पाठवले आहेत…तेही गुगल पेच्या माध्यमातून. त्यामुळे यासंबंधित बँक आपली तक्रार घेणार नाही. तरी आपल्याला सायबर सेलकडे ताबडतोब तक्रार करावी लागेल. त्यांच्याकडे रोज अशा अनेक तक्रारी सातत्याने येत असतात. यात फॉरेन्सिक तज्ञांचे सहाय्य लागत असल्याने खूप मोङ्गय़ा रकमेचा तपास प्राधान्याने केला जातो. गुगल पेची स्वतःची तक्रार निवारण यंत्रणा आहे तेथे तक्रार करून त्याचा पाङ्गपुरावा करावा. हा एक आयुष्यभराचा विकतचा धडा समजून यापुढे काळजी घ्यावी. पैसे परत मिळवण्यासाङ्गी चिकाटीने प्रयत्न करावेत. तक्रारी आल्या तरच सर्व तपास यंत्रणा कार्यरत राहतील. अन्यथा त्या गाफील राहतील. तेव्हा तक्रार करून त्याचा मागोवा घेत राहावे.
माझे काही मित्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificialed Intelligence) वापर करून ट्रेडिंगवर नफा मिळवत आहेत, मी असे ट्रेडिंग करावे का? – संजोग वेलिंगकर, चिपळूण
उत्तर – कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून चांगल्या पंपन्या शोधणे, त्याचे मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण करणे, भविष्यात भाव काय असेल याचा अंदाज करणे, पूर्णपणे भावनाविरहित खरेदी-विक्री व्यवहार करणे, बाजाराचा अंदाज घेऊन झटपट ऑर्डर्स टाकणे, स्टॉपलॉस लावणे, ऑर्डरमध्ये बदल करणे या गोष्टी करता येणे सोपे होऊ शकते. असे असले तरी यासाङ्गी बनवलेला प्रोग्राम कोणीतरी माणसाने बनवलेला असल्याने जरी तो आपोआप काम करत असेल तरी त्यावर ज्याने हा प्रोग्राम लिहिला त्या व्यक्तीच्या मर्यादा येतात. त्यामुळे केवळ मित्र सांगतात या भरवशावर न राहता छोटे ट्रेड घेऊन अनुभव घ्यावा. बहुधा अशा गोष्टी मोफत मिळत नाहीत त्याचा फ्री डेमो घ्यावा, सपोर्ट सिस्टीम समजून घ्यावी, आत्मविश्वास वाढल्यावर सावधतेने मोङ्गे व्यवहार करावेत. आलेले निष्कर्ष शेअर करावेत. अनेकदा यामागे छुपे व्यावसायिक हेतू म्हणजे तुम्ही ज्ञान मिळण्याऐवजी त्यांच्यावर अवलंबून राहावे असे असतात. त्यामुळे सावध राहावे.

























































