लश्कर-ए-तोयबाच्या माजी कमांडरचा पाकिस्तानात खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा मोठा शत्रू लश्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अकरम खान ऊर्फ अकरम गाझी याची पाकिस्तानच्या बाजौर भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अकरम हा सातत्याने हिंदुस्थानविरोधात प्रक्षोभक भाषणे करायचा.

2018 ते 2020 या तीन वर्षांच्या काळात अकरम हा तरुणांना लष्करमध्ये भरती करण्याचे काम करत होता. 9 नोव्हेंबर रोजी गाझी याच्यावर अज्ञात हल्लेखारांनी गोळीबार केला आणि पळून गेले. गाझी हा लष्करच्या काही वरिष्ठ कमांडर्सपैकी एक होता. अनेक वर्षे तो हिंदुस्थानविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.