नगर जिल्हय़ात आढळल्या 85 हजार कुणबी नोंदी, 46 लाख दस्ताऐवजांची तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबीचा इम्पिरिकल डेटा शोधण्याची मोहीम जिह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. यात आतापर्यंत 46 लाख दस्त तपासण्यात आले असून, यातून तब्बल 85 हजार प्रमाणपत्रांच्या नोंदी जिल्हा प्रशासनाच्या हाती आल्या आहेत. दरम्यान, सध्या दिवाळीची धामधूम सुरू असून, अनेक अधिकारी आणि कर्मचाऱयांवर नोंदी शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या अधिकाऱयांची दिवाळी कुणबी नोंदी शोधण्यात जाणार आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी संपूर्ण राज्यात कुणबी शोधमोहीम सुरू आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिह्यात सोमवारपासून (दि. 6) सर्व शासकीय विभागांत कुणबी नोंदणी शोधण्यात येत आहेत. त्याबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला असून, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील या कक्षाचे सदस्य सचिव आहेत.

या समितीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांमधील शाळा सोडल्याच्या रजिस्टरमधील नोंदणी तपासल्या असून, यात 12 हजार 145 जणांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या. जात प्रमाणपत्र वैधता विभागाने 56 हजार जणांना कुणबीचे प्रमाणपत्र दिलेले आहे. अन्य शासकीय विभागासह जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत 85 हजार जणांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदणीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.

24 लाख दाखले तपासले

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने गेल्या सहा दिवसांत 24 लाख 12 हजार 961 शाळा सोडल्याचे दाखले तपासले आहेत. यात 1948 ते 1969 या कालावधीचा समावेश असून, या कालावधीत 11 हजार 776 जणांच्या दाखल्यावर, तर 1969 या एका वर्षात 369 जणांच्या दाखल्यावर कुणबीची नोंद आहे.

खटाव तालुक्यात 179 कुणबीचे पुरावे

खटाव तालुक्यात 179 कुणबी नोंद असलेले मराठीमधील पुरावे उपलब्ध झालेले असून, वरूड, औंध, भोसरे या गावांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार बाई माने यांनी दिली. खटाव तालुक्यामध्ये कुणबी नोंद तपासणी विशेष कक्ष स्थापन केलेला आहे. आतापर्यंत 12,592 नोंदींची तपासणी झाली आहे. यामध्ये 179 कुणबी नोंद असलेले मराठीमधील पुरावे उपलब्ध झालेले आहेत.

जामखेडमध्ये एका व्यक्तीची एकाच रजिस्टरमध्ये वेगवेगळी नोंद

जामखेड तालुक्यातील एकाच घरात भाऊ मराठा, तर बहीण कुणबी असा प्रकार उघडकीस आला होता. आता तर एकाच व्यक्तीची एकाच शाळेत एकाच रजिस्टरमध्ये एकदा कुणबी म्हणून तर एकदा मराठी म्हणून नोंद सापडल्याने खळबळ उडाली आहे. मराठा व कुणबी एकच आहेत, याचा मोठा पुरावाच समोर आला आहे. तालुक्यातील दिघोळ गावातील लक्ष्मण गेणा बेनके जन्म 1 जून 1925 यांची नोंद सुरुवातीला मराठा म्हणून होती. त्यांनी काही दिवस शाळा सोडली; नंतर परत शाळेत नाव दाखल करण्यात आले. तेव्हा याच शाळेत याच रजिस्टरमध्ये नाव लक्ष्मण गेणा बेनके जात कुणबी अशी नोंद आढळली आहे.

जामखेडमध्ये आढळल्या 8802 कुणबी नोंदी

जामखेड तालुक्यात सात सर्कलमध्ये आतापर्यंत 8802 कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. आणखी काम सुरूच आहे. आणखी अनेक घरात कुणबीच्या नोंदी सापडण्याचा अंदाज प्रशासनाला आहे. येत्या दोन दिवसांत हा आकडा अंतिम होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाला आहे. जामखेड तालुक्यात सर्वात जास्त साकत सर्कलमध्ये मराठीतील 1004 व मोडीतील 2471 अशा एकूण 3475 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मराठीतील 6327, तर मोडी भाषेतील 2471 अशा एकूण 8802 नोंदी सापडल्या आहेत. जामखेड तालुक्यातील नोंदी शोधण्यासाठी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या अध्यक्षतेखाली काम सुरू आहे.

दक्षिण सोलापुरात एका दिवसात 46,500 अभिलेखांची तपासणी

राज्य शासनाने मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याबाबत संपूर्ण राज्यात युद्धपातळीकर मोहीम सुरू केलेली आहे, त्या अनुषंगाने जिह्यातील नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्काद यांनी संबंधित यंत्रणाप्रमुखांना निर्देश दिलेले आहेत.

जिल्हाधिकारी आशीर्काद यांनी दक्षिण तहसील कार्यालयातील कक्षास भेट दिली. दक्षिण तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातील कीस सदस्यांनी एकाच दिकसात 46 हजार 500 जुनी अभिलेखे तपासणी केली. या अभिलेखात मराठी क मोडी लिपी भाषेतून मराठा कुणबी नोंदणी आढळून येत आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्काद यांनी दक्षिण तहसील कार्यालयातील अभिलेख तपासणी पथकाला मराठा कुणबी नोंदी अभिलेखात कशा पद्धतीने तपासाक्यात तसेच मोडी लिपीत मराठा कुणबी शब्द कशा पद्धतीने आहे याबाबत माहिती दिली. याकेळी प्रांताधिकारी किठ्ठल उदमले, दक्षिण तहसीलचे तहसीलदार किरण जमदाडे, निकासी नायब तहसीलदार राजाभाऊ भंडारे, नोडल अधिकारी नायब तहसीलदार दत्ता गायककाड, नायब तहसीलदार किठ्ठल जाधक क महसूल चे अन्य कर्मचारी उपस्थित होते.

सांगोल्यात 6 लाख दस्तावेजांची तपासणी; कुणबीच्या 25 नोंदी

सांगोला तालुक्यातील आठ गावांतील मोडीतील 6 लाख पानाच्या केलेल्या तपासणी नोंदीत एकूण 25 कुणबी मराठा, मराठा कुणबीचे उल्लेख असणारे पुरावे सापडले आहेत. सदर पुरावे शोध मोहीम सन 1967 पूर्वीचे सर्व अभिलेखे संपेपर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रशिक्षणार्थी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे व तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले. सांगोला तहसील कार्यालयातील अभिलेखागारमध्ये 6 नोव्हेंबरपासून 10 महसूल मंडलातील सन 1967 पूर्वीचे मोडीतील विविध प्रकारच्या नोंदी, दस्ताऐवज कागदपत्रांची तपासणी चालू असून, आतापर्यंत तालुक्यातील पाचेगाव खुर्द, बामणी, चिकमहूद, मेथवडे, राजापूर, वाढेगाव, डोंगर पाचेगाव, चोपडी या गावांतील सुमारे 6 लाख पानांच्या नोंदी तपासल्या आहेत. यामध्ये 25 नोंदी मराठा कुणबी, मराठा कुणबीचे उल्लेख असणाऱया आढळल्या आहेत.