शी जिनपिंग ‘हुकूमशहा’; चीन-अमेरिका शिखर परिषदेनंतर बायडेन यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा ‘हुकूमशहा’ असा उल्लेख केला आहे. शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर बायडेन यांनी हे विधान केल्यानं खळबळ उडाली आहे. जो बायडेन यांना शी जिनपिंग यांच्याविषयी विचारण्यात आलं, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

बायडेन अजूनही शी जिनपिंग यांना ‘हुकूमशहा’ मानतात का? असं विचारताच ‘हो ते आहेतच’, असं बायडेन म्हणाले.

‘ते एक हुकूमशहा आहेत. अशा अर्थाने ते हुकूमशहा आहेत कारण ते कम्युनिस्ट देश चालवतात’, असं बायडेन म्हणताहेत. चिनी सरकार ‘आपल्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे’.

दरम्यान, यूएस-चीन शिखर बैठक कॅलिफोर्नियात पार पडली. राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि जिनपिंग यांनी दोन्ही देशांमधील मतभेद आटोक्यात राहतील आणि संबंध रुळावर येऊ नयेत यासाठी काम करण्याचे मान्य केले.

प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये मोकळ्या, स्पष्ट चर्चा झाल्या.

दरम्यान याआधी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अॅनालेना बेअरबॉक यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना हुकूमशहा म्हटलं होतं. जर पुतिन युक्रेनविरुद्ध युद्ध जिंकले तर चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंगसारख्या जगभरातील इतर हुकूमशहांना काय संदेश जाईल, असा सवाल त्यांनी केला होता.