
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, दोन्ही बाजूने त्या पक्षावर दावा सांगितला जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचे सूत्रधार असलेले राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व खासदार वंदना चव्हाण यांनी आज वकिलांसह राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची भेट घेऊन राज्यघटनेतील दहाव्या अनुसूचीनुसार पटेल यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द केले जावे, अशी मागणी केली.
पत्रव्यवहाराला प्रतिसाद नाही
पक्षात फूट पडल्यानंतरच प्रफुल्ल पटेल यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी राष्ट्रवादीने धनखड यांच्याकडे केली होती. खासदार वंदना चव्हाण यांनी यासंदर्भात धनखड यांना चार महिन्यांपूर्वीच पत्र पाठविले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आज सभापतीं

























































