
अभिनयाबरोबरच ग्लॅमरल लूकसाठी कायम चर्चेत असलेली अभिनेत्री पूजा सावंत आज चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा डेट नेमके कोणाला करतेय असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. तिचे नावही काही मराठी अभिनेत्यांसोबत जोडले जात होते. मात्र या सर्व अफवांवर पडदा टाकत अखेर पूजा सावंतने तिच्या प्रेमाची कबूली दिली आहे. तसेच या फोटोंमध्ये तिच्या बोटात अंगठी दिसत असल्याने यंदा कर्तव्य असल्याची चा
View this post on Instagram
‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून आपल्या करिअरचा श्रीगणेशा करणारी पूजा सावंत प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. पूजाने आज इंस्टाग्रामवर एका खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये एका तरुणासोबत ती दिसत असून तिच्या हातात अंगठी दिसत आहे. सोबत तिने फोटोओळमध्ये आयुष्याच्या नव्या प्रवास मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू असून आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरु करत आहोत. We are engaged”, असे पूजा सावंतने म्हटले आहे. त्यामुळे आता पूजाचा हा मिस्ट्री मॅन नेमका आहे तरी कोण आहे हे मात्र पूजाने न सांगितल्याने चाहत्यांकडून तर्क लावले जात आहेत. तिने आपल्या या मिस्ट्री मॅनसोबत काही फोटो शेअर केले आहेत. मात्र त्याचा चेहरा दिसणार नाही याचीही काळजी घेतली आहे. त्यामुळे लवकरच अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याचे एकंदरीत दिसत आहे.




























































