
दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दुधाचे दर कमी झाल्याने पशू व्यावसायिकांवर संकट आले आहे. पेंड, पाचाद्य पदार्थासह वैरणीचे भाव प्रचंड वाढले पामुळे शासनाने दुधाचे दर तातडीने वाढवून किमान ३४ रुपये हमीभाव दिलाच पाहिजे, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कामती बुद्रुक येथे निदर्शन करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दगडाला दुधाचा अभिषेक करून शिवसैनिकांनी राज्य सरकारचा निषेध केला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. साठी किमान ३४ रुपये १० पैसे दर निश्चित केला होता. परंतु, आजच्या परिस्थितीत २७, २८ रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे पशुखाद्यासह वैरणीचा खर्चही भागत नाही. म्हणून शासनाने तत्काळ किमान ३४ रुपये दर द्यावा, कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर खाली आले असल्याने कांद्याची निर्यातबंदी त्वरित उठवावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दगडाच्या काळजाच्या शासनाला जाग यावी यासाठी दगडालाच दुधाचा अभिषेक घालून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, मंडल अधिकारी बसवराज सालीमठ, कामती पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाविषयी मते मांडली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा संघटक सिद्धाराम म्हमाणे, बाळासाहेब डुवे-पाटील, सरपंच प्रवीण भोसले, मोहोळ शहरप्रमुख सत्यवान देशमुख, उपतालुकाप्रमुख विनोद आंबरे, वाहतूक सेनेचे सोमनाथ पवार, विजय गायकवाड, संजय वाघमोडे, नरसिंग पाटील, मुकुंद आवताडे, सुभाष सरपळे, शरद गोरे, अर्जुन लोखंडे, समाधान भोसले, युवराज कारंडे, विबोषण गव्हाणे, हेमंत भोसले, बाळासाहेव नंदुरे, नागराज मल्लाडे, सचिन म्हमाणे आदींसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























































