ब्रिजस्टोन इंडियाच्या दोन कारखान्यांमध्ये फुलपाखरू व पक्षी उद्याने; फुलपाखरांच्या 170, तर पक्ष्यांच्या 105 प्रजाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरण व शाश्वततेप्रती बांधिलकी दर्शवत ब्रिजस्टोन इंडियाने पुणे व इंदूर येथील त्यांच्या दोन कारखान्यांमध्ये फुलपाखरू व पक्षी उद्यान उभारले आहे. ही दोन्ही उद्याने एकूण चार एकरहून अधिक क्षेत्रफळात पसरलेली आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने केलेल्या ऑडिटनुसार या उद्यानांमध्ये फुलपाखरांच्या 170 तर पक्ष्यांच्या 105 प्रजाती आहेत. 2020 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि आजपर्यंत या ठिकाणी 7000 हून अधिक होस्ट व मधुरसयुक्त रोपे लावण्यात आली आणि फुलपाखरे व पक्ष्यांसाठी अधिवास निर्माण करण्यात आला. या ठिकाणी वैविध्यपूर्ण जीवसमूह परिसंस्था आहे, जी फुलपाखरांच्या जीवनसाखळीला पाठबळ देते आणि उद्यानाकडे फुलपाखरांना आकर्षित करते.

पुणे व इंदूरमध्ये सहसा न आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती या जैवविविधता उद्यानांमध्ये दिसून आल्या. पुण्यात या ठिकाणी दुर्मीळ असलेल्या प्रजाती म्हणजे जोकर (बायबिला इलिथिया), लाँग ब्रँडेड बुशब्राउन (मायसेलेसिस व्हिसाला), पीकॉक रॉयल (ताजुरिया सिप्पस), प्लेन्स ब्लू रॉयल (ताजुरिया जेहाना), कॉम शॉट सिल्व्हरलाइन (स्पिंडॅसिस आक्टिस) या फुलपाखरू प्रजाती दिसून आल्या.