
>> प्रसाद नायगावकर
नुकतेच हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. विदर्भातील शेतकऱ्यांना या अधिवेशनात आपल्याला हे सरकार काही भरीव मदत करेल अशी आशा होती. पण ती फोल ठरली. शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली . जगाचा पोशिंदा रात्रीचा दिवस करून आपल्या शेतात काबाडकष्ट करतो . पण सरकारच्या अनियमित धोरणामुळे याच शेतकऱ्याला नीटशी चटणी आणि भाकरी सुद्धा नशिबात येत नाही. केळापूर तालुक्यात अतिवृष्टी व इतर कारणाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात झालेले असताना सुद्धा सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. अस्मानी आणि सुलतानी संकटांनी ग्रासलेल्या या आक्रोशीत शेतकऱ्यांनी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जितेंद्र मोघे नेतृत्वात तहसिल कार्यालयावर चटणी भाकर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील हजारों शेतकऱ्यांनी सहभागी होत सरकारच्या उदासीन धोरणाप्रती आपला निषेध व्यक्त केला . यावेळी चटणी – भाकर व सदर सर्व मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले.
केळापूर तालुक्याला तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा. गत काळात झालेल्या अतिवृष्टी मुळे खरीप हंगामातील हाती आलेली बहुतांश पिके वाया गेली. तर उर्वरीत काळात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे पिके करपून गेली. दरम्यान या काळामध्ये पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत या पिकांचे नुकसान भरपाई मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र पीक विमा कंपन्यांकडून सर्व पिकांचे सर्वेक्षण न झाल्याने बहुतांश शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहिले. तर शासनाकडून जाहीर झालेल्या हमी भावांपेक्षा अत्यल्प दरात शेती मालांची खरेदी होत नसल्याने शेतीतगुंतवणुकीपेक्षा उत्पन्नात तफावत आहे. यासह अनेक समस्यांमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करण्यात यावी, खरीप व रब्बी पिकांना पिक विमा जाहिर करुन शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत रक्कम अदा करण्यात यावे,कापसाचे आयात धोरण बंद करुन कापसाचे दर वाढविण्यात यावे, अभयारण्यालगत असलेल्या शेतामध्ये जंगली जनावरांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मदत देण्यात यावी,अभयारण्याला संरक्षण भिंत किंवा तार कुंपण करुन जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा,विज नियमीत करुन विज पुरवठा दिवसा 8 तास देण्यात यावा. वीज पुरवठा ट्रान्सफॉर्मर (डि.पी) जळाल्यास २४ तासाच्या आत बसविण्यात यावे, पीएम किसान सन्मान विकास निधी संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, सर्व कोरडवाहू शेतकऱ्यांना तत्काळ जलसिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यात यावे, बि-बियाणे रासायनिक खते व औषधी यांचे दर कमी करण्यात यावे, शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्याचे डांबरीकरण, खडीकरण तात्काळ करण्यात यावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतक-यांना तात्काळ कर्ज माफीचा लाभ द्यावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेती खर्चाच्या दुप्पट भाव देण्यात यावा, अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन तत्काळ मदत करण्यात यावी, नविन सिंचन विहीरीला तत्काळ वीज जोडणी देण्यात यावी, शेती मालांची हमी भावा पेक्षा कमी दराने खरेदी बंद करावी,अभयारण्याला संरक्षण भिंत किंवा कुंपण करुन जनावरांचा बंदोबस्त करावा,कापूस संकलन केंद्रावर शेतकऱ्यांची लूट थांबून नियमांप्रमाणे खरेदी करावी अश्या मागण्यांचे निवेदन दिले. येत्या 8 दिवसात यावर योग्य तो तोडगा काढावा अन्यथा यापुढें उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा सुध्दा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या सह पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.शहरातील क्रीडा मिञ मंडळ ते तहसिल कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा नंतर जितेंद्र मोघे व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसिलदार इंगळे यांची दालनात भेट घेऊन त्यांना चटणी भाकर भेट देण्यात आणली.यावेळी शेतकरी नेते मोहन मामिडवार, विजय पाटिल, माजी नगराध्यक्ष शंकर बडे, संतोष बोरले, भाऊराव मरापे, अमर पाटिल, श्रीनिवास नालमवार, श्रीहरी कटेवार, बिशनसिंग शिंदो, मनोज भोयर, शिवारेड्डी येलटीवार, गंगारेड्डी क्यातमवार, जान महमद गिलानी, मल्लारेड्डी पानाजवार, रवी बोरोले, व्यंकटरेड्डी सामावार, राजु तालकोकुलवार, प्रेम राठोड, रिजवान शेख, विशेष कुळसंगे चंद्रशेखर पोलिडवार, प्रेमराव वखरे, नाजारेड्डी तोटावार, इकराम अली, जितेंद्रसिंह काँगरेकर ,विष्णू राठोड, प्रशांत बोंडे, दौलत आडे, बाबू बैलिम , अनिस पोस्वल, मकरंद साने , अखिल कोठारे,अशोक कुमरे, किशोर सिक्कलवर, प्रभा किनके, अशोक करलावर, अजय राजूरकर यांच्या सह तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हजारों शेतकरी बांधव उपस्थित होते.



























































