
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ विद्यापीठाच्या फोर्ट येथील सर कावसजी जहांगीर सभागृहात 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात पदवी आणि पदविकांचे वितरण होणार आहे. या सोहळय़ाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवरून करण्यात येईल. जे विद्यार्थी वर्ष 2023 मधील प्रथम तसेच द्वितीय सत्रामध्ये दीक्षान्त समारंभाच्या पूर्वी उत्तीर्ण झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रमाणपत्रे संबंधित महाविद्यालयातून मिळणार आहे. उपलब्ध असलेल्या पदवी, पदविकांची यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. असे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले.





























































