
उत्तर प्रदेशच्या झाशी येथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. आता या हत्येचा खुलासा झाला असून तिच्या काकानेच तिचा खून केल्याचं उघड झालं आहे. बलात्काराचा प्रयत्न फसल्याने काकाने तिची हत्या केली आहे.
मयत मुलगी ही 17 वर्षांची आदिवासी मुलगी होती. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडल्याने तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांना आला होता. या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती उघड झाली. आरोपी काकाला अश्लील व्हिडीओ पाहण्याचं व्यसन होतं. त्याची वाईट नजर तिच्यावर पडली होती.
28 डिसेंबर रोजी पीडिता रात्री शौचासाठी घराबाहेर पडली होती. तेव्हा तिच्या मागावर असलेल्या आरोपीने तिला गाठलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण, पीडितेने बलात्काराचा विरोध करायला सुरुवात केली. तेव्हा आरोपीने तिचा गळा आवळला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह खड्ड्यात टाकला.



























































