मोहन अरवंदेकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन अरवंदेकर (75) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. नायर रुग्णालयामध्ये 37 वर्षांची सेवा देणारे अरवंदेकर अखेरपर्यंत आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते गेली 15 वर्षे नायरच्या अल्युमिनाय या कार्यालयातून रुग्ण आणि हॉस्पिटल यांच्यातील समन्वयक म्हणून काम करत होते. नायर कर्मचारी वाचनालय तसेच लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका मंडळाचे ते पदाधिकारी होते. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. श्रीवर्धन तालुका स्नेहसेवा मंडळाचे ते ज्येष्ठ उपाध्यक्ष होते.