सुंदर मी होणार – काळय़ा रंगाची जादू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)

काळय़ा रंगाचे ड्रेसेस घातल्यानंतर स्मोकी आईज आणि न्यूड लिपस्टिक तसेच न्यूड आईस व न्यूड लिपस्टिकचा वापर केला जातो. तसेच डायमंड ज्वेलरीला प्राधान्य दिले जाते.

मकर संक्रांतीला काळय़ा रंगाचे कपडे परिधान केले जातात. आजही फॅशनच्या दुनियेत काळय़ा रंगाला अतिशय महत्त्व आहे. अनेक वेळा मॉडेल्स काळय़ा रंगाच्या गाऊनमध्ये किंवा ड्रेसमध्ये रॅम्पवॉक करताना दिसते. तसेच अनेक ठिकाणी आपल्याला काळय़ा व पांढऱया रंगाचे कॉम्बिनेशनही पाहायला मिळते. काळा रंग आणि त्याला मोतीया रंग किंवा पांढऱया रंगाच्या मोत्यांची जोड दिल्याने त्याला आणखीन उठावदारपणा येऊन ग्रेसफुल दिसण्यास मदत होते. नवविवाहितेला पहिल्या संक्रांतीला खास काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिले जातात. तर बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त काळय़ा रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात.

आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा मॉडेल काळे कपडे परिधान करून पॅटवॉक करत असतात तेव्हा डोळय़ांचा मेकअप करताना स्मोकी आईजचा जास्त वापर करतात. तसेच अनेक वेळा फॅशन शोमध्ये डोळय़ांवर पांढऱया रंगाच्या काही शेड्स देऊन आयशाडो केले जातात. काळय़ा रंगाच्या साडीवर किंवा ड्रेसेसवर मेकअप करतात फाऊंडेशनचा बेस मात्र हलकाच केला जातो. फक्त आयशाडो, लिपस्टिक यांचा वापर मात्र त्या साडीला किंवा वेगवेगळय़ा फॅशनेबल कपडय़ांवर सूट होईल असा म्हणजे एकतर स्मोकी किंवा सिल्वर शाईन असलेल्या रंगाचे आयशाडो लावून डोळय़ांचा मेकअप करतात . तसेच गडद मस्कारा किंवा मग आयलॅशेसचा वापर केला जातो. फॅशनच्या दुनियेमध्ये किंवा फॅशन शोमध्ये अनेक वेळा काळय़ा रंगाच्या ड्रेसेसवर लाल रंगाची लिपस्टिक लावण्याचा प्रघात जास्त रूढ झालेला आपल्याला दिसून येईल . मात्र अलीकडे न्यूड मेकअपचा वापरही या काळय़ा रंगाच्या ड्रेसेसवर केला जातो. कॉलेजला जाणाऱया मुली किंवा कॉर्पोरेट जगतामध्ये काळय़ा रंगाचे ब्लेझर, काळय़ा रंगाच्या पेंट्स किंवा काळय़ा रंगाचे वन पीस यांचा वापर करून त्यावर अगदी लाईट वेट ज्वेलरीचा वापर केला जातो व मेकपही न्यूड वापरला जातो. काळा रंग हा युनिव्हर्सल कलर मानला जातो.

प्रत्येकाकडेच काळय़ा रंगाची एक तरी साडी किंवा काळय़ा रंगाचा एक तरी ड्रेस असतोच असतो. यावर वेगवेगळय़ा प्रकारचे मॅचिंग तुम्ही करू शकता. तसेच निरनिराळय़ा प्रकारची ज्वेलरी घालता येते.

दागिने कोणते वापराल…

काळय़ा रंगावर वेगळय़ा रंगाची ज्वेलरी घालणे जास्त चांगले. काळय़ा रंगावर जर बॉर्डर गोल्डन असेल तर तुम्ही अँटिक गोल्ड ज्वेलरी वापरू शकता. काळय़ा रंगावर सोनेरी किंवा अगदी ट्रडिशनल साडी असल्यास तुम्ही त्यावर मोती किंवा सोनेरी रंगाचे मोती किंवा गोल्ड पर्ल अशा टाईपची ज्वेलरी वापरू शकता. काळय़ा रंगावर जर तुम्ही अँटिक गोल्ड ज्वेलरी वापरणार असाल तर त्यात तुम्ही ग्रीन कलरचा डायमंड किंवा त्यावर हिरवे पुंदन असलेली ज्वेलरी छान दिसेल तसेच अगदी साधी पुंदन ज्वेलरी या काळय़ा रंगावर उठून दिसते. तसेच बारीक मोती तुम्ही वापरू शकता. काळय़ा रंगाच्या ड्रेसेसवर किंवा काळय़ा रंगाच्या साडीवर अगदी खुलून दिसणारी आणि जगभर प्रसिद्ध अशी ज्वेलरी म्हणजे डायमंड ज्वेलरी.

[email protected]