मी दुसराच बरा! सचिनबरोबरच्या तुलनेला विराट उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांना पाहून मी पहिल्यांदा क्रिकेट खेळलो, मला प्रोत्साहन मिळाले. क्रिकेट खेळण्यासाठी उर्जा मिळाली, अशा महान व्यक्तिशी माझी तुलना करणे योग्य नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी तुलना नको. मी दुसऱ़या क्रमांकावर येऊनच खूप आनंदी झाल्याचे प्रामाणिक आणि शालिन उत्तर विराट कोहलीने एका कार्यक्रमादरम्यान दिले. आपली तुलना फक्त अशाच लोकांशी करू शकतो, जे तुलना योग्य आहेत. ज्यांचा खेळ पाहून माझी पावले क्रिकेटच्या मैदानावर पडली त्यांच्याशी माझी तुलना योग्य नसल्याचे मत विराटने पुन्हा एकदा मांडले. गेल्यावर्षी वर्ल्ड कपदरम्यान सचिन तेंडुलकरच्या 49 वन डे शतकांचा विक्रम मोडल्यावरही त्याने सचिनच्या बाबत मैदानातच सन्मान व्यक्त केला होता.