‘केआयआयटी’च्या विद्यार्थ्यांना 63 लाखांचे पॅकेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुवनेश्वर येथील केआयआयटी डीम्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. युनिव्हर्सिटीच्या पाच हजार विद्यार्थ्यांना 6200 जॉब ऑफर करण्यात आले आहेत. 8.5 लाखांपासून ते 63 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज असलेल्या नोकऱ्या विद्यार्थ्यांना ऑफर करण्यात आल्या आहेत.

कॅम्पस प्लेसमेंटमध्ये 750 हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ‘केआयआयटी’च्या स्कूल ऑफ टेक्नोलॉजी, स्कूल ऑफ मॅनेजमेंट, स्कूल ऑफ रुरल मॅनेजमेंट, स्कूल ऑफ बायोटेक्नोलॉजी आणि स्कूल ऑफ लॉमधील पाच हजार विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये भाग घेतला. त्यातील 1800 विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त कंपन्यांनी नोकरीसाठी ऑफर दिली, तर 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना 60 कंपन्यांकडून पेड इंटर्नशिपची संधी मिळाली.