
>> वर्षा चोपडे
पालघाटचा किल्ला तथा पालक्कड किल्ला किंवा टिपूचा किल्ला केरळमधील पर्यटनस्थळांमध्ये महत्त्वाचे fिठकाण आहे. पालक्कड या शहराला ‘केरळचे धान्य कोठार’ असेही म्हणतात. पूर्वीच्या काळी पालक्कडला पालक्कट्टुसेरी म्हणूनही ओळखले जात असे. असे मानतात की, पालक्कड हे नाव ‘पाल’ या देशी झाडापासून आले आहे, ज्याने एकेकाळी पालक्कडची जमीन व्यापली होती. म्हणूनच हे पालक्कड किंवा ‘पाल वृक्षांचे जंगल’.
?पालक्कडचा प्राचीन इतिहास गूढतेने व्यापलेला आहे. ‘मलबार मॅन्युअल’चे लेखक विल्यम लोगन यांच्या मते, कांचीच्या पल्लव राजघराण्याने इसवी सनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात मलबारवर आाढमण केले असावे. त्यांच्या मुख्यालयांपैकी एक ‘पालकडा’ नावाचे ठिकाण होते जे सध्याचे पालक्कड असू शकते. पालक्कड जिह्याच्या निर्मितीपूर्वी सध्याचा पालक्कड जिल्हा मलबार जिह्याचा एक भाग होता. कोईम्बतूरच्या आसपासच्या प्रदेशावर संगम काळात चेरांचे राज्य होते. इ.स.चे पहिले आणि चौथे शतक मलबार किनारा आणि तामीळनाडूदरम्यानचा प्रमुख व्यापारी मार्ग होता व पालक्कडचे पूर्वेकडील प्रवेशद्वार होते. भरतपुझा नदीच्या उत्तरेकडील तीरावर वसलेल्या पालक्कड शहरावर राजा तरूर स्वरूपम यांनी राज्य केले. पालक्कड, अलाथूर आणि चित्तूर या तालुक्यांवर पालक्कड राजाचा अधिकार होता. पालक्कड राजांचे मूळ मुख्यालय सध्याच्या मलप्पुरम जिह्यातील अथवानद, थिरूर तालुक्यांत होते.
पुढे पालक्कडचा काही भाग काही काळ झामोरिन राजाच्या ताब्यात गेला होता. 1757 मध्ये कोझिकोडच्या झामोरिनच्या आाढमणाचा प्रतिकार करण्यासाठी पालक्कड राजाने पुढे पालक्कडचा राजा पलिअम स्वरूपम याने मैसूरचे फौजदार हैदरअलीची मदत घेतली. 1766 मध्ये हैदरअलीने कोझिकोडच्या झामोरिनचा पराभव केला.
हैदरअलीने 1766 मध्ये पालक्कड किल्ला पुन्हा बांधला. केरळच्या उत्तर आणि उत्तर-मध्य भागांमधील मलबार जिह्याचा समावेश असलेली लहान संस्थाने मैसूरच्या शासकांखाली एकत्र करण्यात आली आणि त्यांना मोठय़ा राज्याचा एक भाग बनवण्यात आले. टिपू सुलतानचे वडील हैदरअली हे मैसूरच्या वोडेयार शासकांच्या अंतर्गत काम करीत. उत्तराधिकारी टिपू सुलतान याने विस्तारत असलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध मोहिमा सुरू केल्या. त्याने ब्रिटिश वसाहती विस्ताराचा तीव्र प्रतिकार केला. किल्ल्यात प्रवेश केल्यावर हनुमान मंदिर आहे. या मंदिरात टिपू आणि त्याच्या योद्धय़ांनी पूजा केल्याचे सांगितले जाते. तिसऱ्या अँग्लो-मैसूर युद्धात त्याचा पराभव झाला. किल्ला मजबूत आणि प्रशस्त आहे. किल्ल्याव्यतिरिक्त येथे पुरातत्त्व सर्वेक्षण भारतीय माहिती केंद्र संग्रहालयाचे संरक्षित स्मारक, पायऱ्यांची विहीर, जुने जेल घर, पाण्याची तळे, सभागृह आहे.
पूर्वी हा किल्ला एक महत्त्वाचे लष्करी तळ होते.
18 व्या शतकात हैदरअलीने पुन्हा बांधला. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात येईपर्यंत मैसूरच्या अधिपत्याखाली होता. ब्रिटिशांच्या काळात सरकारी सेवा देण्यासाठी त्याचा वापर केला जात असे. सेनापती हैदरचा मुलगा टिपू सुलतान याच्या नावावर असलेले हे आज एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. हा दक्षिण हिंदुस्थानातील सर्वोत्तम संरक्षित किल्ल्यांपैकी एक आहे. भ्क्कम लॅटराइट भिंती पर्यटकांना प्रभावित करतात. किल्ला आणि पालक्कड टाऊन
हॉलमध्ये असलेले मोठे मैदान हे सार्वजनिक सभा आणि महत्त्वाच्या कार्पामांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. आज हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाअंतर्गत संरक्षित स्मारक आहे. हा किल्ला बघणे फार सुंदर अनुभव आहे. पालक्कडला भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक पसंतीचे पिकनिक स्पॉट आहे. या किल्ल्याव्यतिरिक्त पालक्कडच्या इतरही पर्यटनस्थळांना तुम्ही भेट देऊ शकता.
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)



























































