Amazon Prime Video च्या यूजर्ससाठी बातमी, आता व्हिडीओसाठी मोजावे लागतील जास्तीचे पैसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हि़डीओ वापरत असाल तर ही तुमच्यासाठी बातमी आहे. आता अलीकडे कंपनीने अनेक बदल केले आहेत. नेटफ्लिक्सच्या तुलनेने अॅमेझॉन प्राईम स्वस्त असल्याने अनेकजण अॅमेझॉन प्राईम वापरणे सोयीचे मानतात. मात्र आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ मध्येही काही बदल करण्यात आले आहेत. आता व्हिडीओ पाहण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत.

कंपनीने आता नवीन नियम लागू केला आहे. मात्र, हा नवा नियम हिंदुस्थानियांसाठी नाही. पण तुम्हाला जाहिरातीशिवाय व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील. पैसे न भरल्यास, व्हिडिओ दरम्यान जाहिराती दाखवल्या जातील. हे मोठे बदल अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि कॅनडामध्ये झाले आहेत. म्हणजेच या देशांमध्ये व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील.

मात्र, हिंदुस्थानी युजर्स कंपनीकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. हे बदल 29 जानेवारीपासून होणार आहेत. जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहण्यासाठी वापरकर्त्यांना दरमहा 2.99 अमेरीकन डॉलर ​​भरावे लागतील. मात्र, ही मोठी रक्कम सिद्ध होऊ शकते. कारण याशिवाय तुम्हाला मासिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. याशिवाय ही रक्कम द्यावी लागेल. कंपनीकडून नुकतेच हे डिटेल्स शेअर करण्यात आले आहेत. आता वापरकर्त्यांना जाहिरातमुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे द्यावे लागतील. याची सुरुवात कंपनीने 2005 साली केली होती. यानंतर कंपनीने अनेक बदल केले आहेत. तसेच, 2 दिवसात शिपिंगचे आश्वासन दिले होते. म्हणजेच प्राइम मेंबरशिप घेतल्यास फास्ट डिलिव्हरीचा पर्यायही दिला जाईल. हिंदुस्थानवा अनेक लोक प्राइम व्हिडिओ वापरतात. अशा परिस्थितीत कंपनी अशा वापरकर्त्यांसाठी वेगळे शुल्क आकारू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.