आरोग्य योजनांचे सर्व्हर ठप्प, राज्यभर रुग्णांवरील उपचार खोळंबले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या पोर्टलचे सर्व्हर दोन दिवसांपासून ठप्प झाले आहे. ऑनलाईन मंजुरीअभावी उपचार खोळंबल्याने राज्यभरातील शेकडो रुग्णांची हेळसांड होत आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱया रुग्णांना आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आर्थिक सवलत मिळते. यासाठी नोंदणी व मंजुरीही ऑनलाईन पद्धतीनेच होते. सोमवारपासून या येजनांच्या पोर्टलचे सर्व्हर ठप्प झाल्याने रुग्णांच्या उपचारात मोठय़ा प्रमाणात खोळंबा निर्माण झाला आहे. तातडीच्या व गंभीर आजाराच्या रुग्णांना पदरमोड करून खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. अनेक रुग्णालयातून आर्थिक अडचणींमुळे रुग्ण परत जात आहेत. काही रुग्णालयांमध्ये दाखल केले जाते, पण खर्चीक उपचारासाठी योजनेच्या मंजुरीची प्रतिक्षा करावी लागत आहे.