मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा वाढल्याने राज्याकडे दुर्लक्ष, बाळासाहेब थोरात यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारमधील अनेकांमध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा सुरू असून, या नेत्यांचे राज्याकडे दुर्लक्ष झाले आहे, अशी टीका कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आमदरा बाळासाहेब थोरात यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना केली. सरकारमधील नेत्यांचा आपापसात मेळ नसल्याने प्रशासन व पोलिसांवर धाक राहिलेला नाही. त्यामुळे राज्यात खुनासारखे गंभीर प्रकार घडत आहेत, असा आरोप त्यांनी केला. तर भाजप जिंकण्यासाठी काहीही करू शकते भाजप निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करू शकतो. ईव्हीएममध्ये घोटाळा देखील करू शकतात असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी आमदार लहू कानडे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे उपस्थित होते.

राज्य शासन अपयशी ठरले आहे. हे तीन लोक झाले असून एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला आहे. कुणी पक्ष बदलला तर असं सांगत नाही, की स्वतःच्या हितासाठी पक्ष बदलला हा माझा राजकीय हेतू होता. ते सगळे जनतेचेच हित सांगत असतात पण जनता सुद्धा दूधखुळी नाही. एखाद्या पारावरच्या इसमाला सांगितलं खरी शिवसेना कोणाची खरी राष्ट्रवादी कोणाची तो जे उत्तर देईल तो खरा न्याय.

भाजप जिंकण्यासाठी काहीही करू शकते
भाजप निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करू शकतो. ईव्हीएममध्ये घोटाळा देखील करू शकतात. यावर आपला विश्वास बसत नव्हता. मात्र चंदिगड येथे झालेल्या महापौर निवडणुकीमध्ये ईव्हीएमबाबत छेडछाड झाली. सुप्रीम कोर्टाने देखील यावर ताशेरे ओढले आहेत. यावरून निश्चितच ईव्हीएममध्ये घोटाळा करता येऊ शकतो. यावर आपला विश्वास बसला असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

थोरात म्हणाले की, गृहमंत्री पदावर असलेले उपमुख्यमंत्री यापूर्वी मुख्यमंत्री होते तर दुसर्‍या उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षी आहे. या सर्व परिस्थितीत राज्यात गुंडगिरी वाढली आहे. मुंबईत माजी नगरसेवक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. तर दुसर्‍या घटनेत भाजपच्या आमदाराने मित्र पक्षाच्या पदाधिकार्‍यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय संस्था सत्ताधार्‍यांच्या गुलाम झाल्या आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाया सुरु असून त्या राजकीय हेतूने होत असल्याचे दिसून येत आहे, असेही थोरात म्हणाले.

काँग्रेसला कोणी सोडून गेला म्हणून काहीही थांबत नाही
काँग्रेस पक्षाला अनेकजण सोडून जात आहे त्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता थोरात यांनी सांगितले की. कठीण काळ हा पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा हे मी मान्य करतो 80 साली सुद्धा अशी अवस्था होती. काँग्रेस कुठे आहे हे विचारलं जातं होतं. इंद्राजीच्या सोबत फिरण्यासाठी माणसे नव्हतं. 99 ला 19 ला काँग्रेसचे किती उमेदवार येईल हे विचारले जातं होते. मात्र मोठ्या झाडाचे फांद्या शेतकरी छाटतो आणि त्याला नव्या पालव्या फुटतात त्यामुळे कोणी गेला म्हणून काहीही थांबत नाही.

शिर्डी मतदारसंघावर कॉंग्रेसचा दावा
नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस प्रबळ आहे. या मतदार संघावर शिवसेनेने दावा केला असला तरी कॉंग्रेसकडे प्रबळ उमेदवार आहे. मात्र याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेतला जाईल, असे थोरात यांनी सांगितले.