शीतलादेवी मंदिरात शांतादुर्गेचा माघी नवरात्रोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहीम येथील शितलादेवी मंदिर येथे शांतादुर्गा देवस्थानचा माघी नवरात्र उत्सव 10 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. उत्सव 19 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. घटस्थापना, नवचंडी पाठ, कुंकुमार्चन आधी पूजाविधी पार पडत असून. 13 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. देवीची भव्य पालखी मिरवणूक व महाआरती गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. 17 फेब्रुवारी रोजी नवचंडीचा होम, तर 19 फेब्रुवारी रोजी शांती होम आयोजित करण्यात आला आहे.