
यावर्षी जून महिन्यात टी-20 वर्ल्डकप सुरू होणार असून हा वर्ल्डकप वेस्ट इंडिज व अमेरिका या दोन देशात खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपला टीम इंडिया रोहीत शर्माच्याच नेतृत्त्वात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शहा यांनी आज ही माहिती दिली.
India have confirmed their captain for the 2024 #T20WorldCup 🚨
— ICC (@ICC) February 14, 2024
बुधवारी राजकोट स्टेडीयमचे निरंजन शाह स्टेडियम असे नामकरण करण्यात आले. या सोहळ्यात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी टी -20 वर्ल्ड कप रोहीतच्या नेतृत्तवातच टीम इंडिया खेळणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच हा वर्ल्ड कप टीम इंडियाच जिंकणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

























































