मूल विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक वर्षाच्या मुलाची विक्रीप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी आठजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याचा अधिक तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.

रायगड येथे राहणारे एक जण एक वर्षाच्या मुलाला घेऊन उपचारासाठी वाडिया रुग्णालयात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी शेरा मारल्यानंतर ते भोईवाडा पोलीस ठाण्यात आले.

तेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्या व्यक्तीच्या लग्नाला 30 वर्षे झाल्यानंतरही त्यांना मूल झाले नव्हते. गेल्या वर्षी त्या व्यक्तीची बहीण त्याच्या घरी आली. ते राहत असलेल्या त्या गावात राहणाऱया एका महिलेला तिचे मूल नको होते. त्यामुळे त्याने ते मूल घेण्याचे ठरवले. त्यानंतर त्याने त्या महिलेची भेट घेतली. मध्यस्थीच्या माध्यमातून ते मूल देण्याचे ठरले. त्याने याची माहिती गावातील एका उपसरपंचाला दिली. त्यानंतर मूल घेण्याबाबत एक मीटिंग झाली. त्या मीटिंगला काही जण उपस्थित होते. ते मूल 40 हजार रुपयांत विक्रीचे ठरले. सुरुवातीला 5 हजार रुपये ऍडव्हान्स आणि उर्वरित 35 हजार रुपये हे जूनपर्यंत द्यायचे होते. मुलाच्या खरेदीच्या व्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 336, 34 आणि बाल न्याय मुलाची काळजी संरक्षण अधिनियम 2015 नुसार गुन्हा नोंद केला आहे.