
पोलिसांवर वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर यांनी नितेश राणे हा वेडा आमदार असल्याचे म्हटले आहे.
”नितेश राणे हा वेडा आमदार आहे. त्याच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही. पोलिसांनी नितेश राणेवर कारवाई करू नये. एक वेडा आमदार बोलतोय असं समजून दुर्लक्ष करावं. त्याच्यावर कारवाई न करने घातक ठरेल असं मला बिलकूल वाटत नाही. समाजही त्याच्याकडे फार लक्ष देत नाहीत”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

























































